Live... Live... Live
बऱ्याच आपल्या ग्रुप मधील मैत्रिणी असंख्य वेळा live गेल्या असतील.
last year पर्यंत आम्ही प्रत्येकीला Live जा आणि प्रोमोशन करा किंवा माहिती पूर्ण इन्फॉर्मशन द्या असे मागे लागत होतो.
त्यामुळेच आम्ही MLA -health हे section चालू केले त्यानंतर education section चालू केले. हेतू एकच होता. कीं ग्रुप ची engagement वाढवी , मेंबर्स चा कॉन्फिडन्स वाढावा.
आता live चे फायदे किती आहेत हे जरी तुम्हा
सगळ्यांना माहित असले तरी .. ऍडमिन टीम नजरेतून काय Live चे महत्व काय आहे किंवा त्याला effective कसा असतो.
नक्की वाचा आणि आवडल्यास इम्पलमेंट करण्याचा प्रयत्न करा.
Live चे बुकिंग च्या टाईमिंग मध्ये खूप मेंबर्स particular असतात.. असायला पण पाहिजे..
पण जेव्हा तुम्ही announce किंवा creative पोस्ट टाकता.. तेव्हा मेंबर्स तुम्ही Live येण्याची वाट पाहायला हवं...
का वाट बघतील..?
काय strategy करायला पाहिजे...?
महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन या फेसबुक ग्रुप मध्ये live चे स्लॉट तुमच्या availability वर तुम्हाला मिळतो.
means जर live बुक करायला वेळ झाला तरच तुम्हाला उरलेले स्लॉट मधून तुम्हाला तुमचा time सिलेक्ट करावा लागतो.
जेव्हा बुक करता त्यानंतर तुम्हाला एक creative मिळते.
याचे प्रोमोशन तुम्हाला तुमच्या वॉल वर, status, इन्स्टा आणि ग्रुपमध्ये (फेसबुक आणि WhatsApp ग्रुप ) सगळीकडे तुम्हाला सांगायचे असते कीं मी Live येणार आहे.
आणि काही surprise आहेत...... काही ऑफर्स आहेत .....काही डिस्काउंट्स आहेत.
असे प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी ऑफर किंवा ऍक्टिव्हिटी हे सगळया पोस्ट मध्ये नमूद करायला पाहिजे.
ज्यामुळे त्यांची उत्सुकता वाढेल.
आता अजून प्रभावी कसे करता येईल एक छोटा promo व्हिडिओ बनवून तुम्ही live येता आहात हे सांगू शकता.
(just like flimstars or radio stations - hello my name is...
and catch me on MLA Facebook group at... am/pm)
बाकी पण ऑफर्स सांगू शकता... !
Live च्या एकदिवस आधी आणि same day ला Live चे प्रोमोशन करू शकता.
पण एक दिवस आधी Live प्रोमोशन जास्त effectively सर्वा पर्यंत पोहचेल आणि
ती वेळ तुमच्यासाठी block करून ठेवतील.
MLA Live session mostly preapproval असते.
असे क्वचित होते कीं live सुरु झाल्यानंतर approve होते.
पण जर approve नाही झाली तर लगेच पॅनिक होऊन इकडे तिकडे ग्रुप मध्ये msg न टाकता direct ऍडमिन टीम शी कॉन्टॅक्ट करायचा.
Live ची टीम आहे त्यांना एकदा msg किंवा फोन करायचा.
न पॅनिक होता live कॉन्फिडन्स ने सुरु करायचा.
- एकदा समजले कीं आपण live दिसतो आहे आणि आपला आवाज पण क्लिअर आहे..
- त्यानंतर एक ते दोन मिनिट सगळ्यांना ग्रीट करा. हॅलो बोला.. त्यात तुमची मैत्रीण live पाहत असतील तर त्यांची चौकशी करा.
- तुम्हांला कदाचित माहित नसेल कीं live मध्ये आपले नाव आले कीं मेंबर्स ना खूप आनंद होतो. असे नाही कीं Live time लिमिटेड आहे पटापट प्रॉडक्ट्स दाखवा price सांगा आणि संपवून टाका....!
- यामध्ये conversion rate कमी होतो. आणि live खूप रटाळ वाटते.. audiences कडे eye-contact आणि त्यांच्या प्रत्येक कंमेंट वर प्रतिक्रिया दिल्या तर audience खिळून राहते.
- प्रॉडक्ट्स माहिती सांगताना ही 20-30 सेकंड चा गॅप घ्या दुसरा प्रॉडक्ट सुरु करण्याचा आधी. त्यामुळे अजून उत्सुकता ताणून राहते. तोपर्यंत बाकी लोकांना हॉलो आणि तुमचे live पाहत असताना thank you बोलत रहा.
- जर तुमचा स्क्रीन खूप लांब आहे आणि तुम्हाला स्क्रीन वरचे कंमेंटस दिसत नाहीयेत तर ऑर्डर घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अजून एक जनाला बसवा. त्यामुळे पण effectively conversions होतील.
- प्रत्येक वेळेस Live मध्ये same entry करावी असा काही नाही ,काही वेळेस एखादे गाणे, एखादी गोस्ट , किस्सा किंवा जोक अशी एकदा सुरुवात करून पहा. आणि शेवटी ऑफर किंवा जे काही ऍक्टिव्हिटी किंवा कॉन्टेस्ट जे पण काही तुम्ही त्या live मध्ये ठेवले असेल ते सर्व झाल्यावर पुढच्या live चे announcement आणि पुढची ऑफर सांगायला विसरू नका.
Live ड्रेस्अप
✅️Live ड्रेस up मस्तच असला पाहिजे.. काहीतरी तुमच्याच प्रॉडक्ट मधून unique पीस घालून live करा.
✅️Light makeup आणि thodi लिपस्टिक ही कम्पल्सरी असली पाहिजे.
✅️सगळ्यात महत्वाचे चेहऱ्यावर छानस smile पाहिजे.. असे नाही कीं खूप दुनियाभर चे टेन्शस चेहऱ्यावर
दिसत आहेत.
✅️तुमच्या चेहऱ्यावर उत्साह आणि कॉन्फिडन्स हा तुमच्या यशाचे रहस्य असणार आहे.
Live जाण्याचे फायदे
- Live मुळे trust factor वाढतो.
- visibility वाढते. आणि Live इम्पॅक्टस बऱ्याच दिवसापर्यंत असते.
- त्यामुळे conversions नंतर ही होत राहतात.
एम एल ए ग्रुप मध्ये live कधीच delete करत नाहीत. आणि live झाल्यानंतर ही बरेच दिवस कंमेंट्स, ऑर्डर्स चालू असतात. त्यामुळे त्याचे नोटिफिकेशन बंद करून ठेवल्यास conversion वर त्याचा परिणाम होऊ शकतो. शक्य झाल्यास दोन तीन दिवसानंतर परत पोस्ट चेक करत रहा आणि आपल्या business ला accelerate करा.
ज्यांना अजूनही live ज्याण्याची भीती वाटते त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही नेहमीच त्यांच्या मदतीतीसाठी उपस्तिथ राहू .
आम्हाला आशा आहे कीं नक्कीच तुम्हा सगळ्यांना याचा फायदा होईल.
ऍडमिन के दिल से 😊
Maharashtrian ladies Association
https://www.facebook.com/groups/MaharashtrianLadiesAssociation/
किती छान समजून सांगितले live चे importance
ReplyDelete